चांगल्या कॉलेस्ट्रॉलसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, हृदय राहील निरोगी

आपल्या शरिरात कॉलेस्ट्रॉलची पातळी व्यवस्थित असणे गरजेचे आहे. हे चरबीसारखे आहे, जे शरीरात योग्य प्रमाणात असल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत करते. जर शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

विशेष म्हणजे यकृत जरी शरीरात कॉलेस्ट्रॉलची निर्मिती करत असले, तरी आपल्या खाण्यापिण्यातूनही कॉलेस्ट्रॉल शरीरात प्रवेश करते. हे कॉलेस्ट्रॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लिपोप्रोटिन्स मदत करतात.

हे लिपोप्रोटिन्स २ प्रकारचे असतात. उच्च घनता आणि कमी घनता. यातील उच्च घनतेच्या लिपोप्रोटिन्सला (HDL) चांगले कॉलेस्ट्रॉल असे म्हटले जाते तर कमी घनता असलेल्या लिपोप्रोटिन्सला (LDL) खराब किंवा वाईट कॉलेस्ट्रॉल असे म्हटले जाते.
निरोगी राहण्यासाठी चांगले कॉलेस्ट्रॉल हे आवश्यक असते. या चांगल्या कॉलेस्ट्रॉलसाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांमुळे शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल तयार होण्यास मदत होते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. हे डार्क चॉकलेट आपल्या शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु, याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. चांगल्या कॉलेस्ट्रॉलसाठी तुम्ही आहारात डार्क चॉकलेटचा समावेश करू शकता.

फॅटी फिश

मासे खाणारे अनेक लोक तुमच्या आसपास तुम्हाला पहायला मिळतील. मासे खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते. सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. हे  फॅटी अ‍ॅसिड आपल्या शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात.

बेरीज

बेरीज खायला सगळ्यांनाच आवडते. बेरीजमध्ये विविध प्रकार पहायला मिळतात. यामध्ये ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरीचा समावेश असतो. या बेरीजमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. जे आपल्या शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात. यामुळे, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने