मृत्यूनंतर फंडमधील पैशाचे काय

मृत्यूनंतर फंडमधील पैशाचे काय?
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हि कधीही काढता येत नाही. डिजिटल गुंतवणुकीमुळे एका क्लिकवर आपण फंडमधील सर्व पैसे काढून घेऊ शकता. म्हणूनच फंडमधील पैसे काढणे हे अतिशय सुलभ आणि सुटसुटीत मानले जाते. मात्र, एक दुर्देवी घटनांमुळे गुंतणूकदाराचे कुटुंब म्युच्युअल फंडमधील पैसे काढू शकत नाही म्हणूनच गुंतवणूकदाराच्या मृत्यू झाल्यास पैसे काढण्याची प्रक्रिया इथे सांगता येईल. तसेच वारसासंदर्भात नियम देखील इथे नमूद करता येतील. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हि एकल किंवा दुकळ मार्गाने देखील करता येते. तीन जणांच्या माध्यमातूनही म्युच्युअल फंडची  गुंतवणूक करता येते.गुंतवणूक दारांच्या मृत्यूनंतर ते युनिट नॉमिनीच्या नावावर स्थलांतरित होते. युनिट ट्रांसफ़र करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. नॉमिनीहा केवळ गुंतवणुकीचा कस्टोडियन असतो. नॉमिनीला कायदेशीर वारशाला पैसे द्यावे लागतात. शेवटी भविष्यातील गुंतवणुकीतील कायदेशीर क्लिष्टता टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणुकीला नॉमिनी देणे आवश्यक बाब ठरते. तसेच एकट्याने गुंतवणूक करण्याऐवजी संयुक्तपणे गुंतवणुकीबाबत आग्रही. असावे
ट्रान्सफरसाठीची प्रक्रिया : दोन गुंतवणुकरापैकी एकाच मृत्यू गुंतणवूकदाराचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावर लागते. या प्रमाणपत्राला गॅझेटड अधिकाऱ्याने साक्षांकित करणे गरजेचं आहे. बँक मॅनेजरकडूनही सर्टिफिकेट अटेस्टेड करत येते. गुंतवणूकदाराच्या नावाने कॅन्सल चेक देखील देता येतो. बँक अकाउंट स्टेटमेंट देखील यावेल्ली मान्य होईल. जीवित गुंतवणूकरदाराचा केवायसी झाला नसेल, तर फॉरेन अकाउंट टॅक्स कंप्लायन्स ऍक्ट आणि कॉमन रिपोर्टींग स्टॅन्डर्डची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे 
म्युच्युअल फंड डिमॅटमध्ये असतील तर .: म्युच्युअल फंडचे युनिट डिमॅट खात्यात असतील, तर अशा स्थितीत ट्रान्सफरची प्रक्रिया सामान असेल. केवळ डिमॅट चे कागदपत्र वेगवेगळे असतील, जर क्लेम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर क्लेमसाठी नोटरी केलेली विलची कॉपी , कायदेशीर वारस असलेले प्रमाणपत्र , कोर्टातून जारी केलेलेसर्टिफिकेट जमा करावे लागेल. त्याचबरोबर एफएटीसीए , सीआरएसला सम्पूर्ण माहिती सादर करावी लागेल. 
सर्व गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास : जर सर्व सह गुंतवणूकदारचा मृत्यू झाल्यास क्लेमसाठी रिक्वेस्ट लेटर द्यावे लागेल. त्याचबरोबर मृतकाचे डेथ सर्टिफिकेट सादर करावेल लागते.  सर्टिफिकेटला गॅझेटड अधिकाऱ्याकडून साक्षांकित करणे आवश्यक आहे. बँक मॅनेजरकडूनही सर्टिफिकेट साक्षकीत करून घेता येते. नॉमिनीसाठी केवायसीदेखील करणे गरजेचे आहे. यासाठी एफएटी सीए आणि सीआरएस ची माहिती सादर करणे आवश्यक आहे. 
नॉमिनी नोंदलेला नसेल तर. : नॉमिनीला क्लेमसाठी रिक्वेस्ट लेटर सादर करावे लागेल. यानुसार मृत गुंतवणूकदाचे डेथ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. सेंटिफिकेटला गॅझेटेड अधिकाऱ्याकडून अटेस्टेड करावे लागते. बँक मॅनेजरकडून देखील अटेस्टंड करता येते. नॉमिनीसाठी केवायसी आवश्यक आहे कायदेशीर उत्तराधिकारी होण्यासाठी बॉण्ड अनेश्चर ३१ , कायदेशीर वारसासाठी व्यक्तिगत शपथपत्र अनेशर ४१ द्यावे लागेल. दोन लाखापेक्षा कमी रक्कम असेल, ते नाते सिद्ध करावे लागेल. दोन लाखापेक्षा अधिक रक्कम असेल, तर कागदपत्रे सादर करावी लागतील. 

थोडे नवीन जरा जुने