Jammu Kashmir: लष्कराने तीन दिवसात घेतला बदला, अधिकाऱ्याच्या हत्येत सहभागी दहशतवाद्यांना केलं ठार, चकमक अद्यापही सुरु

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन आणि एका स्थानिक दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. शोपियन जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय लष्कराला हे यश मिळालं. द्राच परिसरात एक चकमक सुरु असून, मुलू येथेही भारतीय लष्कराकडून कारवाई सुरु आहे.सुरक्षा जवानांनी द्राच परिसरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर मुलू येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. ठार करण्यात आलेले दोन दहशतवादी एसपीओ जावेद दार यांच्या हत्येत सहभागी होते. 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने