'भाऊ अंगावर आला काटा!' अक्षयच्या 'रामसेतू'च्या ट्रेलरनं वादळ

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या राम सेतूचा ट्रेलर आता व्हायरल झाला आहे. त्याच्या टीझरवरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या ट्रेलरनं मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या ट्रेलरची चर्चा होती. अभिषेक शर्मा यांनी केलेल्या दिग्दर्शन केलेल्या राम सेतूवरुन अक्षय हा काही काळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका रोबोटमुळे त्याला आर्यनमॅनची कॉपी असेही म्हटले गेले होते.



अक्षयच्या राम सेतूमध्ये जॅकलीन फर्नांडिझ, नुसरत भरुचा यांच्या भूमिका आहेत. येत्या 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानं आता प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेकांनी अक्षयवर कौतूकाचा वर्षाव केल्याचे यानिमित्तानं दिसून आले आहे.

सोशल मीडियावर अक्षयच्या आगामी राम सेतूचा ट्रेलर आता व्हायरल झाला आहे. साधारण दोन मिनिटं आणि नऊ सेकंदाच्या त्या व्हिडिओनं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. बऱ्याच दिवसांनी अक्षय एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आला आहे. राम सेतूचे व्हिएफएक्स, ग्राफीक्स आणि बॅकग्राउंड म्युझिक चाहत्यांना प्रचंड भावले आहे. त्यांनी अक्षयच्या दमदार परफॉर्मन्सचे कौतूकही केले आहे. ट्रेलरचा शेवटची सीन तर अंगावर काटा आणणारा आहे. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने