मशाल चिन्हावर पहिली निवडणूक लढवणाऱ्या छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया म्हणाले ...

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह आणि नाव देण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाचं चिन्हं अजून ठरलं नसून त्यांनी निवडणूक आयोगाकडे पर्याय दिले आहेत. याच दरम्यान पहिल्यांदा मशाल चिन्हावर निवडणूक लढलेले जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या मशाल चिन्हाविषयी आणि निवडणुकाविषयी आठवणी सांगितल्या आहेत.



ते बोलताना म्हणाले की, आम्ही निवडणुका लढायला लागलो तेव्हा चिन्हं नव्हतं. 1978ला मी निवडून आलो तेव्हा आमचा गट लहान होता. लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभेची निवडणूक झाली बरेच उमेदवार उभे राहिले. तेव्हा वाटेल ते चिन्हं आम्ही घेतलं. तेव्हा मी मशाल चिन्हं घेतलं. मशाल चिन्हं भिंतीवर काढायला सोपं होतं म्हणून मी तेच घेतलं होत. त्यानंतर आम्ही प्रचार करायला लागलो आणि निवडणुकीत फक्त मी एकटाच निवडून आलो. त्यावेळी माझी निशाणी मशाल होती.

पुढे ते म्हणाले की, त्यानंतर बऱ्याच निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हं घ्यायला लागलो. त्यावेळी आमचे 74 लोक निवडून आले. त्यावेळी मला बाळासाहेबांनी महापौर केलं. त्यानंतर महापौर परिषदेचा चेअरमन म्हणूनही मी निवडून आलो. त्यावेळी मला लाल दिव्याची गाडी मिळाली. त्यावेळी सर्वाना त्याचं खूप आकर्षण होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी मला कायमच पाठिंबा दिला. ते कायमच आमच्या पाठीशी उभे राहिले.आताही आम्हाला खात्री आहे की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बाकी पक्षांचा पाठिंबा आहे त्यामुळे ते नक्कीच निवडून येऊ शकतील असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. हा वाद व्हायला नको होता. काही कारणास्तव मी बाहेर पडलो, नारायण राणे बाहेर पडले, राज बाहेर पडले पण असा वाद व्हायला नको होता असंही भुजबळ म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने