नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयात, अनिल देसाई म्हणाले “अत्यंत घाईत…”

दिल्ली : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही गोठवले. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आयोगाने नैसर्गिक न्यायाचं तत्व पाळलं नाही आणि आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी न देताच घाईत निर्णय दिला असं मत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१० ऑक्टोबर) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.



अनिल देसाई म्हणाले, “शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं पालन झालं नाही. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी शनिवारी पक्षाशी संबंधित सर्व गोष्टी मागवल्या. आम्ही शनिवारीच सर्व गोष्टी सादर केल्या. मात्र, आयोगाने आमचं म्हणणं ऐकून न घेता शनिवारी रात्रीच निर्णय दिला.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने