चीनमध्ये शी जिनपिंग यांची हुकूमशाही; माजी राष्ट्राध्यक्षांना जबरदस्तीने काढले बाहेर

चीन: चीनमध्ये पुन्हा एकदा शी जिनपिंग यांची हुकूमशाही दिसून आली आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या आयोजित बैठकीत हा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये माजी राष्ट्रपती जिंताओ यांना हाताला धरून जबरदस्तीने बाहेर काढले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हू जिंताओ 79 वर्षांचे असून, बैठकीमध्ये जिंताओ यांना समोरील सीटवर बसवण्यात आले होते. काळीवेळानंतर त्यांना बैठकीतून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. जिंताओ यांना बैठकीतून बाहेर का काढण्यात आले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हू जिंताओ 2013 मध्ये निवृत्त झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने