नेपाळ-मॉरिशियसमधील दिवाळी भलतीच निराळी

मुंबई :  भारतातील राज्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगळी असून, हा उत्सव जवळजवळ सर्व राज्यांमध्ये 5 दिवस चालतो. भारताव्यतिरिक्त आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये तसेच अनेक पाश्चात्य देशांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खरं तर, अनिवासी भारतीयांसाठी हा सण म्हणजे मातृभूमिशी अधिक जवळ येण्याचा सण असतो. या उत्सवात केवळ परदेशातील भारतीयच नव्हे तर, सर्वच धर्माचे लोक एकत्र येत हा सण साजरा करतात. आज आपण ब्रिटन, मॉरिशस आणि नेपाळसह भारतातील विविध राज्यांमध्ये कशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.



ब्रिटनमध्ये अशी साजरी होते दिवाळी

भारताबाहेर दिवाळीचा सर्वात मोठा उत्सव ब्रिटनमधील घनदाट जंगलाने वेढलेल्या लीसेस्टर शहरात साजरा केला जातो. येथे वास्तव्यस असणारे हिंदू, जैन आणि शीख समुदाय हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. एवढेच नव्हे तर, इतर धर्मांचे लोकही हा सण आपला सण म्हणून साजरा करतात. येथे लोक दिवाळीत दिवे लावण्यासोबतच, मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजीचा आनंद घेतात. तसेच उद्यानात आणि रस्त्यावर एकत्र जमून उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

नेपाळ आणि मॉरिशसमध्ये, नवविवाहित करतात हे विशेष काम

ब्रिटनशिवाय नेपाळ आणि मॉरिशसमध्येदेखील भारताप्रमाणेच दिवाळी साजरी केली जाते. परंतु येथे नवविवाहित वधूकडून दिवे लावण्याची परंपरा आहे. मलेशियामध्ये दिवाळीला लोकांना सुट्टी जाहीर केली जाते. तर, नेपाळमध्ये दिवाळीला तिहार असे संबोधले जाते. भारताप्रमाणेच येथेही गणेश-लक्ष्मीची पूजा केली जाते. नेपाळमध्ये हा सण पाच दिवस साजरा केला जातो. येथेदेखील दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. येथे पहिला दिवस गायीसाठी समर्पित असतो. यादिवशी गायीची पूजा करून भोजन केले जाते. दुसरा दिवस हा कुत्र्यांसाठी समर्पित असतो. तिसऱ्या दिवशी येथे दिवे लावले जातात. चौथ्या दिवशी येथे मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते तर, पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.

गोव्यात रांगोळीचे मोठे महत्त्व

सुंदर सागरी किनारपट्टीवर वसलेल्या गोव्यात गोवावासीयांची दिवाळी पाहण्यासारखी असते. पारंपारिक नृत्य आणि गाण्यापासून सुरुवात करून दिवाळीत पारंपारिक पदार्थांची चव चाखली जाते. याशिवाय येथे रांगोळी काढण्याचे खूप महत्त्व आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने