पैसे न भरता बुक करता येणार रेल्वेचं तिकीट, सणासुदीचं प्रवाशांना गिफ्ट.

मुंबई : सणावाराच्या काळात रेल्वे प्रवासाकडे प्रवाशांचा ओघ वाढतो. अशावेळी तिकीट बुकींगवर खूप ताण येतो. महिनोंन् महिने प्रवाशांना तिकीट मिळणं कठीण होतं. अशावेळी जास्तीच्या गाड्या सुरू करणं, इतर विविध योजना भारतीय रेल्वेकडून काढल्या जातात. त्यातच दिवाळीसाठी प्रवाशांना एक खास गिफ्ट देण्यात आलं आहे.या योजनेत प्रवाशांना प्रवास आधी करून तिकीटाचे पैसे नंतर भरता येणार आहे. सहा महिन्याच्या कालावधीत पैसे भरता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने नवीन सुविधा सुरू केली आहे.

ट्रॅव्हल नाऊ ॲण्ड पे लेटर' अशा या नव्या खास सुविधेचे नाव आहे. 'Travel Now Pay Later' ची सुविधा देण्यासाठी IRCTC ने CASHe सोबत भागिदारी केली आहे. अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा स्थितीत 'Travel Now Pay Later' चा वापर करता येईल.



काय आहे योजना?

  • या नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना एकही पैसा न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहे.

  • ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट ॲपवरही उपलब्ध आहे.

  • या नव्या सुविधेमुळे तुम्ही EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक शकता.

  • CASHe च्या माध्यमातून 'Travel Now Pay Later' साठी साधारण आणि तात्काळ तिकीट बुक करू शकता.

  • तिकीटासाठीची रक्कम ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकतात.

  • या सु्विधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने