'त्याला तळतळाट लागेल, त्याच्यामुळे सोडला देश!

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खान हा आता चांगल्याच अडचणीत सापडला आहे. आपण कुठून बिग बॉसमध्ये आलो असे त्याला वाटले तर नवल नाही. त्याचे कारण बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटी अभिनेत्रींनी त्याच्यावर मी टू चे आरोप केले आहेत. या व्यक्तीनं केलेली बदनामी, त्यांच्यावर शाररिक बळजबरी केल्याचा आरोप त्या अभिनेत्रींनी केला आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका बातमीनुसार, दिल्लीच्या महिला आयोगानं देखील माहिती व प्रसारण खात्याला साजिद खानला तातडीनं बिग बॉसमधून काढून टाका अशा मागणीचे पत्र दिले आहे.





सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कनिष्का सोनीची पोस्ट व्हायरल झाली आहे. तिनं त्या पोस्टमध्ये साजिद खानवर आगपाखड केली आहे. साजिद हा सध्या बिग बॉसच्या सोळाव्या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. तो या शोमध्ये आल्यापासून नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काही अभिनेत्री आणि नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या मेकर्सला साजिद खानला या शोमध्ये का सहभागी करुन घेतले असा प्रश्न केला आहे. त्यावरुन साजिदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कनिष्का सोनीनं साजिदवर मी टू चे आरोप केले आहेत. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यानं आपल्यासोबत अश्लील कृत्य केले होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा टीव्ही क्षेत्रात काम करणं अवघड होवून बसलं. त्यानं माझं करिअर उद्धवस्त केलं. कनिष्कानं तळतळून साजिदविषयी राग व्यक्त केला आहे. तिनं त्या व्हिडिओतून आपल्याला कशाप्रकारे साजिदनं त्रास दिला याविषयी सांगितलं आहे. टीव्ही अभिनेत्री म्हणून कनिष्का ही अनेकांना माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने