धोनीच्या चित्रपटात 'नयनतारा', साऊथमध्ये फुल टू धिंगाणा!

मुंबई :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माही अर्थात महेंद्र सिंग धोनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. दीड दशकांहून अधिक काळ ज्याच्या कॅप्टन्सीनं साऱ्या भारतवासीयांना आनंद दिला त्या धोनीच्या सेकंड इनिंगचे अनेकांनी स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या सिक्रेट मिशनची चर्चा होती. अखेर त्यानं आपण चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

रिटायरमेंट नंतर धोनी चित्रपटात भूमिका करणार की काय अशी चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरुन आता धोनीच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवले आहेत. 2019 मध्ये धोनीनं स्वताचे एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते. त्याचे नाव धोनी एंटरटेनमेंट असे होते. त्यानंतर आता धोनीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. तो एका चित्रपटामध्ये टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा समवेत दिसणार आहे.



काही मीडिया रिपोर्टसनुसार, धोनी हा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यानं काही चित्रपट साईन केले आहे. धोनीच्या पहिल्या चित्रपटामध्ये नयनतारा काम करणार असल्यानं चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावर अजुन अधिकृतरित्या नयनताराकडून कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही. मात्र चाहत्यांना या चित्रपटाविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने