ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?


मुंबई
 :  एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी मागच्या वर्षी ऐन सणासुदीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने हा संप चालल्याने राज्यातील नागरिकांचे हाल झाले. मोठ्या शिताफीने सरकारने हा संप मिटवण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या आणि आश्वासनं दिली होती. मात्र, अजूनही काही मागण्या आणि पगार रखडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमद्धे नाराजी दिसून येत आहे.

या कारणास्तव, ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संप करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे, एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार रखडला आहे. या महिन्याची 10 तारीख उलटली तरीही त्यांना पगार मिळाला नाही. याशिवाय सरकारने औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि सरकारने उच्च न्यायालयाला दिलेली हमी पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सरकारवर होत आहे.


दरम्यान, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्माचाऱ्यांचाही निव्वळ पगार आहे. त्यामुळे कामगारांचे पीएफ, विमा, घराचे हफ्तेही थकले आहे. सरकारच्या या कारभारामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल कामगारांत तीव्र नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या न्याय-हक्कांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन आणि संपाच्या पावित्र्यात दिसून येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने