सच्चा शिवसैनिक खोटी कागदपत्रे देणार नाही :संजय मंडलिक

 कोल्हापूर : मुंबईत पाच हजार बनावट प्रमाणपत्रे मिळून आली आहेत. कोणत्याही गटाची प्रतिज्ञापत्रे असू देत, ती तपासली पाहिजेत. कारण खऱ्या अर्थाने सच्चा शिवसैनिक कधीही खोटी कागदपत्रे सादर करणार नाही. खोटी कागदपत्रे सादर करणे हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे माझ्यासारख्या शिवसैनिकाला वाटते. ज्यांनी आपल्याला समर्थन मिळत नाही, म्हणून जर का भाडोत्री लोकांची प्रतिज्ञापत्र दिली असतील, तर त्याचा तपास तपास यंत्रणा करेल, असे प्रतिपादन शिंदे गटातील खासदार संजय मंडलिक म्हणाले.



चिन्हाबाबत ते म्हणाले, ‘‘ढाल-तलवार शौर्याचे प्रतीक आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांचे ढालीने रक्षण करणे आणि जे खोटे वार होताहेत, ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवले जात आहे. त्याविरोधात ही तलवार चालविणे, यासाठी प्रतीक म्हणून ढाल-तलवार आहे. चिन्हाबाबातचा पूर्ण निकाल होईल, त्यावेळी धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मिळेल, अशी खात्री आहे.’’‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे शिंदे गटाला नाव देण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्‍हणजे हे बाळासाहेब नेमके कोण, असा सवाल करणाऱ्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली असून, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची हे जगजाहीर असतानाही हा गैरसमज पसरविणाऱ्यांनी आत्‍मचिंतन करावे.’’

-संजय मंडलिक, खासदार, शिंदे गट

ज्या जिल्ह्यात नव्या सरकारविरोधात आंदोलन झालेले आहे, त्या जिल्ह्यात शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी सुरू आहे. आजची कारवाई हा त्याचाच एक भाग आहे, पण जिल्ह्यातील शिवसैनिकाकडून दाखल झालेली प्रतिज्ञापत्रे ही खरी आहेत.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने