निवृत्तीनंतर त्याने चक्क एक देशच स्थापन केला; दोन खांबांवरचा छोटा देश.

 मुंबई : कार्यालयीन कामातून निवृत्ती मिळवल्यानंतर आपण काय करतो ? नातवंडांसोबत खेळतो, सामाजिक कार्य करतो, फिरायला जातो आणि आराम करतो. पण ब्रिटीश फौजेतला एक मेजर निवृत्त झाला आणि त्याने चक्क एक अख्खा देशच स्थापन केला.हा जगातील सर्वांत लहान देश केवळ दोन खांबांवर वसलेला आहे; पण तरीही त्यांच्याकडे त्यांचा झेंडा आहे, राष्ट्रगीत आहे आणि फुटबॉलची टीमसुद्धा.सीलँड हे चिमुकलं संस्थान इंग्लंडच्या सफॉक किनाऱ्याजवळ आहे. हा जगातला सर्वात लहान देश आहे असं म्हटलं जातं. खरंतर हा दुसऱ्या महायुद्धात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. १९४२मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं एचएम फोर्ट रफ्स.

हा किल्ला ब्रिटनच्या सीमेबाहेर होता. शस्त्रांनी सज्जही होता. युद्धकाळात इथं रॉयल नेव्हीचे ३०० सैनिक तैनात होते. १९५६मध्ये इथून नौदल पूर्णपणे हटवलं आणि हा किल्ला बेवारशासारखा एकाकी झाला.१९६६पर्यंत हा किल्ला निर्जनच होता. मग एकेदिवशी ब्रिटिश फौजेतला एक निवृत्त मेजर इथे आला आणि त्याने नव्या देशाची स्थापना केली. हा किल्ला किनाऱ्यापासून १२ किमी दूर आहे आणि नावेतून पाहाता येतो. दिसायला आजिबात खास वाटत नाही. दोन खांबांवर एखाद्या कंटेनरसारख्या इमारतीचं बांधकाम आहे.नावेतून तिथे जाणाऱ्या व्यक्तीला क्रेनने वर ओढावं लागतं. त्याशिवाय वर जाण्याचा दुसरा रस्ताच नाही. 'इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरचा क्युबा' असा या देशाचा उल्लेख ब्रिटीश कागदपत्रांमध्ये आहे.युद्धाच्या काळात ब्रिटनने हा प्लॅटफॉर्म आपल्या सामुद्रसीमेबाहेर अवैधरित्या बांधला होता. पण तेव्हा युद्धाच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नव्हता. खरंतर तेव्हाच हे नष्ट करण्याची संधी ब्रिटिशांकडे होती पण त्यांनी तिकडं ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक दशकं सीलँड तिथंच उभा आहे.

सीलँडचं क्षेत्रफळ फक्त ०.००४ चौ. किमी आहे. 'मायक्रोनेशन : द लोनली प्लॅनेट गाईड टू होम-मेड नेशन्स' या पुस्तकाचे सहलेखक जॉर्ड डनफोर्ड म्हणतात, अशा कृतीसाठी वर्तमान सरकारविरुद्धचा असंतोष आणि आपल्या पद्धतीनं काम करण्याची असणारी इच्छा कारणीभूत असते.डनफोर्ड म्हणतात, सीलँड हे एक विशेष प्रकरण आहे. कारण दीर्घकाळापासून ते सुरू आहे आणि कायद्याच्या कचाट्यातून नेहमी सुटलेलं प्रकरण आहे.

अमेरिकेत अशा कुटुंबाला एक असंतुष्ट कुटंब म्हणून पाहिलं गेलं असतं. पण १९६०च्या दशकात ब्रिटन अधिक उदार होतं तेव्हा हे प्रकरण सोडवण्यात काही फायदा नाही असं अधिकाऱ्यांना वाटलं असेल. एकदोनदा प्रयत्न करुन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला पण त्यातून सीलँड सुटलं.



मान्यतेचे नियम

कोणत्याही देशाने या देशाला मान्यता दिलेली नाही. पण या देशाला त्याची पर्वा नाही. लहान देशांना मान्यता देण्याचे नियम १९३३ साली मॉंटेव्हीडिओ संमेलनात तयार करण्यात आले होते. त्यात अशा राज्यांचे अधिकार आणि कर्तव्यं निश्चित केली होती.अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्टसह आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याच संमेलनात राज्यासाठी चार मापदंड ठरवण्यात आले होते.

लहान देशांना या मापदंडाच्या आधारावरच मान्यता मिळते असं डनफोर्ड सांगतात. देश म्हणवलं जाण्यासाठी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, सरकार आणि इतर देशांशी संबंध यांचा विचार केला जातो.

चौथा आणि शेवटचा मापदंड लहान देशांना जास्त जेरीस आणतो कारण ते सतत आपल्याला मान्यता द्या यासाठी इतर देशांकडे भूणभूण लावत असतात. सीलँड मात्र असं करत नाही. ते स्वतःला सार्वभौम समजतात आणि त्यावर आपलाच हक्क असल्याचं समजतात.

प्रत्येक देशाच्या उत्पत्तीची, जन्माची एक कहाणी असते. सीलँडची कहाणी १९६५पासून सुरू होते. पॅडी रॉय बेट्स ब्रिटिश सैन्यात मेजरपदावरुन निवृत्त झालेले होते. त्यानंतर त्यांनी मासेमारी सुरू केली होती. त्यांनी रेडियो इसेक्सची स्थापना केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने