2024 पर्यंत अमेरिकेपेक्षाही या राज्यात होतील चांगले रस्ते; नितीन गडकरी यांचा दावा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील रस्त्यांचा दर्जा 2024 पर्यंत अमेरिकेपेक्षाही अधिक चांगला असेल असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या 81 व्या अधिवेशनात गडकरी बोलत होते. या अधिवेशनामध्ये रस्ते निर्माण याच्याशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सुमारे 2500 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

या कार्यक्रमावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राज्यात 2024 पूर्वी एकूण पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून उत्तर प्रदेशमधील पायाभूत विकासाला चालना मिळणार आहे. यामध्ये शाहाबाद बायपास ते हरदोई बायपास 1212 कोटी रुपये, शाहजहापूर ते शाहाबाद बायपास 950 कोटी रुपये, मुरादाबाद ते काशीपूर राष्ट्रीय महामार्ग 2007 कोटी रुपये, गाजीपूर ते बालिया महामार्ग 1708 कोटी रुपये आणि 13 रेल्वे पूल यांचा समावेश असणार आहे. या व्यतिरीक्त आणखी योजनांचा समावेश आहे.


नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, हे गरजेचं नाही की तुमच्याकडे असेल ते सर्वच बेस्ट असावं, आपण राज्यात पर्यावरणाला हानी न पोहोचवता या रस्त्यांची निर्मिती करणार आहोत. इकोनॉमी सोबतच इकोलॉजीकडे देखील लक्ष देणे आवश्यक असल्याचंही गडकरी या आधिवेशनात बोलताना म्हणालेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने