जोरात कमवलं, झटक्यात गमवलं; अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका

मुंबई : जगातल्या कोट्यधीशांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. जगातले सर्वात श्रीमंत मानली जाणारी व्यक्ती म्हणजे एलॉन मस्क आणि जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचीही संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे आता या सगळ्या कोट्यधीशांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. कशामुळे बसला आहे हा फटका?



ब्लूमबर्गने दिलेल्या एका अहवालानुसार भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची नेटवर्थ झटक्यात कमी झाली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये १७ हजार कोटींच्या आसपास घट झाली आहे. तर टेस्लाचे प्रमुख आणि जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जाणारे एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये एकाच दिवसात ८५ हजार कोटींची घट झाली आहे. त्यामुळे या कोट्यधीशांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं.

कशामुळे होतंय हे नुकसान?

टेस्ला, अदानी गृप आणि अंबानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळेच या उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं समोर येत आहे. केवळ अंबानी अदानीच नव्हे, जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसचंही ५.९२ बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे. मुकेश अंबानी जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहेत. अंबानींची एकूण संपत्ती ८३.६ बिलियन डॉलर आहे. यांच्या संपत्तीमध्ये २४ तासांमध्येत साधारण ९३.७ मिलियन डॉलरची घट झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने