नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय. नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली.



नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समीर वानखडे यांच्या तक्रारीनंतर अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशीम कोर्टाने दिले आहेत. समीर वानखेडे यांनी स्वतः वाशीम कोर्टात दाखल होत २४ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. तसेच जामिन अर्जदेखील कोर्टाने फेटाळली आहे.

एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरुद्ध अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. संबंधित प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसेच मलिक यांच्या जातीचे कादगपत्रे समोर आणत त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने