ट्विटरचं फिचर आता व्हॉट्सॲपलाही! चॅटिंग होईल आणखी इंटरेस्टिंग

अमेरिका :इलॉन मस्कने ट्विटरची डिल फायनल केल्यानंतर आाता ट्विटरमध्येही बरेच बदल करण्यात येत असल्याचे दिसून येतेय. त्याबरोबरच आता व्हॉट्सॲपनेही त्यांच्या फिचरमध्ये ट्विटर फिचर्सचा समावेश करून घेतलाय. तुम्हाला या नव्या फिचरची कल्पना होती काय? नसल्यास हे इंटरेस्टिंग फिचर तुम्हीही जाणून घ्यायला हवे.



WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी एडिट मेसेजसोबत एक एडिट लेबलही आणेल. जो रिसीव्हरला मेसेज एडिट झाल्याचे सांगेल. हे वैशिष्ट्य ट्विटरने अलीकडेच लाँच केलेल्या Edit बटणासारखे असेल. या फीचरचे नाव काय आहे आणि नेमके ते कसे असेल जाणून घ्या.रिपोर्टनुसार Whatsapp एडिटिंग मॅसेजेच आणत आहेत. या फिचरच्या मदतीने यूजर्स पाठवलेला मेसेज एडिट करू शकतील. एवढेच नव्हे तर युजर्सला एडिटेड मेसेजसोबत एडिटेड लेबलही दिसेल. हे फिचर ट्विटरने अलीकडेच विकसित केलेल्या एडिट फिचरसारखे असेल.

WABetaInfo ने जाहिर केलेल्या रिपोर्टनुसार तुम्ही मॅसेज सेंड केल्यानंतर तुम्हाला १५ मिनिटापर्यंत मॅसेज एडिट करता येणार आहे. मॅसेज वाचून एडिट करता येईल की नाही यासंदर्भात अजूनही व्हॉट्सॲपने अधिकृत माहिती दिलेली नाही. एडिट फिचरच्या माध्यमातून तुम्ही कोणाला चुकीचा मॅसेज केला असल्यास तो करेक्ट करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध झालाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने