BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?

मुंबई : बीसीसीआयने नुकतेच बांगलादेश दौऱ्यावरील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सूर्यकुमार यादव सध्या न्यूझीलंडमध्ये असून तो या दौऱ्यावरील वनडे मालिकेत खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग आहे. मात्र त्याला बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावरूनच सोशल मीडियावर काही चाहत्यांनी #Casteist_BCCI हा ट्रेंड सुरू केला आहे. या ट्रेंडवर नंतर संजू सॅमसनच्या नावानेही अनेक ट्विट करण्यात आले आहेत.



बीसीसीआयने काल (दि.23) बांगलादेश विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्यावेळी संघात सूर्यकुमार यादवचे नाव नसल्याचे पाहून द प्रींट या वेबसाईटसाठी स्तंभलेखन करणाऱ्या दिलीप मंडल यांनी एक ट्विट केले. त्यानंतरच सोशल मीडियावर #Casteist_BCCI यावेळी त्यांनी सूर्यकुमार यादवचा न्यूझीलंडमध्ये मालिकावीराने गौरव झालेला फोटो शेअर करत त्याला 'मग हा संघाच्या बाहेर का आहे? संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला काय करावे लागणार? आपले आडनाव बदलावे का? #Casteist_BCCI' असे कॅप्शन दिले. यानंतर ट्विटरवर Casteist_BCCI चा ट्रेंड जोर पकडू लागला.

बांगलादेश दौऱ्यासाठीचा भारतीय वनडे संघ पुढीप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने