प्रयोगाचा खेळ अंगलट, ३० जणांची ट्रायल घेऊनही राहुल-रोहित जोडी फेल

मुंबई : भारताचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघात केलेल्या अनेक बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघात केलेले अनेक प्रयोग अंगलट आले असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.ज्यावेळी २०२१ मध्ये भारत T20 विश्वचषक स्पर्धेत सुपर-12 मधून बाहेर पडला त्यावेळी संघात अनेक मोठे बदल करण्यात आले. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. तसेच, रवी शास्त्रीच्या जागी राहुल द्रविडला संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

या दोन्ही बदलानंतर भारतीय संघाची स्थिती आणि दिशा दोन्ही बदलेल अशी अपेक्षा होती. हित आणि राहुलची जोडी भारतासाठी खूप यशस्वी ठरेल असे मानले जात होते पण ही जोडी फ्लॉप ठरली असल्याचे पाहायला मिळाले.रोहित कर्णधार आणि द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसणारा सर्वात मोठा बदल म्हणजे पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजांची आक्रमक भूमिका. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये 8.6 प्रति षटक धावा केल्या होत्या, परंतु विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पुनरावृत्ती करता आली नाही.वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ पॉवरप्लेमध्ये षटकात केवळ 6 धावा करू शकला संघाला मोठा तोटा सहन करावा लागला.



अनेक प्रयोग फ्लॉप ठरले

द्रविडच्या आगमनानंतर भारतीय संघात अनेक प्रयोग पाहायला मिळाले. जर आपण टी 20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 1 वर्षात जवळपास 30 खेळाडूंवर प्रयत्न केले गेले. उमरान मलिक आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंनी भारतीय जर्सी परिधान केली आहे. मात्र, इतके बदल करूनही टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला संघ गेल्या वर्षीच्या संघासारखाच होता. अशा स्थितीत वर्षभरात इतके प्रयोग का झाले आणि त्याचा उपयोग किती झाला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

टीम इलेक्शनमध्ये गडबड

गतवर्षीच्या विश्वचषकाला मुकलेल्या युझवेंद्र चहलची यावेळी संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आर अश्विन सातत्याने निरुत्साह दाखवत असला तरी संघ व्यवस्थापनाने चहलकडे दुर्लक्ष करणेच योग्य मानले.मोहम्मद शमीने गेल्या वर्षीच्या टी 20 विश्वचषकानंतर एकही T20 आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही, पण असे असतानाही दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी त्याचा या वर्षीच्या विश्वचषकासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षल पटेल हा संघाचा एक्स फॅक्टर मानला जात होता पण त्याला वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसवण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने