आफताबचा फास आवळला! जंगलात सापडलेली हाडं...

नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडानं देशभरात एकच खळबळ उडाली होती. हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. श्रद्धा लग्नाचा तगादा लावत असल्यानं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकर आफताब पुनावालानेच तिची हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट आली असून आफताबचा फास आवळला आहे.



श्रद्धा केसमध्ये जंगलात आफताबने दाखवलेल्या जागी हाडं सापडली होती. ती श्रद्धाचीच असल्याचं समोर आलं आहे. जंगलात सापडलेल्या हाडांची फॉरेन्सीक चाचणी करण्यात आल होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून हाडांची डीएनए आणि श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए जुळले आहेत. हा पुरावा श्रद्धा मर्डर केसमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पुराव्याच्या आधारे आरोपी आफताब पुनावाला याला जास्तीतजास्त शिक्षा होऊ शकते.

यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, फॉरेन्सींक अहवाल पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा टप्पा आहे. आफताबने पोलिसांसमोर कुबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जंगलातून हाडं गोळा केली होती. मात्र ती हाड कोणाची याचा प्रश्न होता. मात्र अहवालातून ते हाडं श्रद्धाचीच आहे, हे सिद्ध झालं असेल तर आफताबच्या विरुद्ध हा महत्त्वाचा परिस्थितीजन्य पुरावा ठरणार आहे. यावर आफताबला या हाडांवर स्पष्टीकरण देता आलं नाही, तर आफताबने श्रद्धाचा खुन केला हे सिद्ध होऊ शकतं, असंही निकम यांनी म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने