मोदींना थोरल्या भावाचा सल्ला, आता त्यांनी...; वाचा काय म्हणाले सोमभाऊ

गुजरात: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतचं मतदान पार पडलं, यंदाची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासाठी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. यानंतर दीडएक वर्षानंतर लोकसभा निवडणूकही होणार आहे. यासाठी होमग्राऊंडवरची ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. असं असताना आता मोदींना त्यांच्या घरच्या मंडळींनीच राजकारणातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

मोदींचे थोरले बंधू सोमभाऊ यांनी त्यांना हा सल्ला दिला आहे. गुजरातच्या निवडणुकीत मतदानानंतर त्यांनी हे विधान केल्यानं चर्चेचा विषय ठरलं आहे.पंतप्रधान मोदींचे थोरले बंधू सोमभाऊ मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद इथं मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमधील रानीप इथल्या निशान पब्लिक स्कूलमधील केंद्रावर त्यांनी मतदान केलं. या मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींनी देखील मतदान केलं. मतदानानंतर सोमभाऊ मीडियाशी बोलले यावेळी पंतप्रधानांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेची माहिती देताना ते भावूक झाले.



सोमभाऊ म्हणाले, मी त्यांना सांगितलं की, त्यांनी देशासाठी खूप काम केलंय आता त्यांनी काहीकाळ राजकारणातून ब्रेक घ्यायला हवा. यावेळी त्यांनी गुजरातच्या मतदारांना देखील सल्ला दिला. जनतेनं आपल्या मताचा योग्य वापर करावा.ज्या पक्षानं देशाच्या विकासासाठी काम केलं आहे अशाच पक्षाला त्यांनी मत द्यायला हवं. २०१४ पासून देशात अशा प्रकारचं काम झालेलं आहे, याकडे लोक दुर्लक्ष करु शकत नाहीत. लोकांनी या कामगिरीवरच मतदान करायला हवं, असं आवाहन त्यांनी गुजरातच्या जनतेला केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने