परदेशातून येणाऱ्यांसाठी केंद्रानं जाहीर केल्या गाईडलाईन्स; 24 डिसेंबरपासून...

नवी दिल्ली : चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अॅलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलान्स जाहीर केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत लेखी निर्देश जाहीर केले आहेत. हे नियम चीनसह ज्या देशांमध्ये सध्या कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. त्या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना ही नवी नियमावली लागू असेल. त्यानुसार, एअर सुविधा फॉर्म पुन्हा भरणं अनिवार्य असणार आहे. या फॉर्ममध्ये ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीची माहिती देणं आवश्यक आहे.




दरम्यान, २४ डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय फ्लाईटमधून येणाऱ्या काही प्रवाशांची रँडमली कोविड चाचणी केली जाणार आहे. केंद्राच्या माहितीनुसार, संबंधित फ्लाईटमधून कोणालाही चाचणीसाठी निवडलं जाईल. प्रत्येक फ्लाईटमधील किमान २ टक्के लोकांना या चाचणीला समोरं जावं लागणार आहे. सँपल दिल्यानंतर या प्रवाशांना विमानतळावरुन सोडण्यात येईल. जर एखाद्याच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याच्या रक्ताचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येतील.

चीन, अमेरिका, जपानसह इतर काही देशांमध्ये अचानक पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या स्थिचीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने