सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीला मोठा अपघात; 16 जवान शहीद

सिक्कीम: सिक्कीममध्ये एक मोठा रस्ता अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कराच्या गाडीला अपघात होऊन १६ जवान शहीद झाले आहेत.लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील गेमा येथे ही घटना घडली. लष्कराचा हा ट्रक सकाळी चतनहून थांगूच्या दिशेने निघाला होता. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर लष्कराच्या तीन वाहनांपैकी एक ट्रक तीव्र उतारावरून घसराला. यात गाडीतील १६ जवान शहीद झाले असून, चार जवान जखमी झाले आहेत. 



अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून, अपघातातील चार जखमी जवानांना उपचारांसाठी विमानाने हलवण्यात आले. या रस्ते अपघातात तीन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि 13 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने