रणवीरच्या नाठाळ 'माकडउड्या', सर्कशीचा 'खेळखंडोबा'!

मुंबई: मसालापटाच्या नावानं हल्ली दिग्दर्शक जे काही सादर करत आहे ते पाहून आपण हा चित्रपट का पाहायला आलो असं वाटण्याची शक्यताच अधिक आहे. रोहित शेट्टी हा बॉलीवूडचा तगडा दिग्दर्शक. बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या या दिग्दर्शकाचा सर्कस नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मात्र ही सर्कस पाहण्यासाठी थिएटरमध्ये फारशी गर्दीच नसल्याचे दिसून आले आहे.

करंट लगा रे.. दीपिका आणि रणवीर सिंगचं ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. एक आगळीवेगळी मेजवानी आपल्याला थिटएरमध्ये मिळणार असल्याचा त्यांचा आनंद हा काही फार वेळ टिकणारा नाही. अशातच प्रचंड उत्साहाचा स्त्रोत असणाऱ्या रणवीर सिंगनं देशभर केलेल्या प्रमोशनमुळे देखील सर्कशीला गर्दी होईल असे म्हटले जात होते. मात्र तेही काही झाले नाही. गोलमालच्या चित्रपटांची मोठी मालिका काढून प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या रोहित शेट्टीच्या सर्कसनं प्रेक्षकांना नाराज केल्याचे दिसून आले आहे.



कॉमेडीच्या नावाखाली ओढून ताणून केलेला विनोद, अचकट, विचकट हावभाव, त्याच्या जोडीला कानठळ्या बसविणारे संगीत यामुळे सर्कस मनोरंजक न ठरता डोकेदुखी ठरु लागतो हे सांगावे लागेल. सिंघम, सिम्बा, त्यानंतर अक्षय कुमारला घेऊन केलेला सुर्यवंशी देखील फार काळ बॉक्स ऑफिसवर टिकला नाही. हवेत गाड्या उडवणं, त्यांची आदळाआपट करणं हा रोहित शेट्टीचा नेहमीचा फंडा आहे. म्हणून त्यानं सर्कसमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. वेगळा विषय, वेगळी मांडणी म्हणून त्याचं कौतूक पण सर्कस फारशी भावताना दिसत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने