एखाद्याचा जलवा काय असतो हे गोविंदाला विचारा.. पठ्ठ्याने 36 तासात 14 सिनेमे साईन केले होते..

मुंबई:  ९० च्या दशकात गोविंदाचा डान्स म्हणजे मायकल जॅक्सनपेक्षा कमी नव्हता. अभिनया बरोबरच गोविंदा डान्समध्ये इतका परफेक्ट आहे की आजची त्याच्या चित्रपटाची गाणी आणि गोविंदाच्या साईन स्टेप लोकांना लख्ख आठवतात. कुणासाठी तो सुपरस्टार आहे तर कुणासाठी डान्सचा देव. आजही फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकार गोविंदाला आपला आयकॉन मानतात. अशा सुपरस्टार गोविंदाचा आज वाढदिवस. आज आपण बॉलीवुडमध्ये एखाद्या कलाकाराची क्रेझ काय असते,हे पाहतोय. पण गोविंदाचे काही किस्से ऐकले तर त्याला सुपरस्टार हा म्हणतात हे कळेल.त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया ही खास बात..



गोविंदा अरुण आहुजा.. म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका गोविंदा.. गोविंदाचा मूळचा पंजाबचा. वडील अरुण कुमार आणि आई निर्मलादेवी ही दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने अभिनयाचे बाळकडू त्याला लहान असतानाच मिळाले. पण त्याच्यासाठी बॉलीवुड मध्ये येणं आणि टिकणं प्रचंड मुश्किल होतं.गोविंदाने 'इल्जाम' सिनेमातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला त्याला काही सिनेमे मिळाले पण एक काळ असाही आला की त्याच्याकडे काम नव्हते. पण त्याने हार मानली नाही. त्याने शरथीचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर त्याचं नशीब पालटलं.

गोविंदाने 'राजा बाबू' , 'कुली नंबर 1' , 'साजन चले ससुराल', 'हिरो नंबर 1', 'दुल्हे राजा', 'स्वर्ग', 'बडे मिया, छोटे मिया', 'जिस देश मे गंगा रहता है', 'नसीब' अशा अनेक सिनेमांत दमदार भूमिका केल्या. असं म्हणतात की त्याची क्रेझ इतकी होती की गोविंदा आहे म्हणजे सिनेमा हिट होणारच असे समीकरण झाले होते. म्हणूनच गोविंदाने 90 च्या दशकात एका वेळी 40 सिनेमे साईन केले होते तर 36 तासात 14 सिनेमे सलग साईन केले होते. त्यावेळी असा विक्रम करणारा गोविंदा एकमेव सुपरस्टार होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने