अनघाचं डोहाळजेवण-अभ्याचं लफडं.. आईचं करणार मुलाची भांडाफोड..

 मुंबई :'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. रोज नवा ट्विस्ट नवं वळण ही मालिका घेत आहे. मध्यंतरी आप्पांची स्मृती गेल्यानंतर आता मालिकेत अनघाच्या डोहाळजेवणाचा घाट घातला आहे. पण हे डोहाळजेवण नीट पार पडेल तर ती मालिका कसली. या डोहाळजेवणात मोठा राडा होणार आहे. अभ्याचं लफडं आई स्वतः उघड करणार आहे.आई कुठे काय करते'ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्ट आणि वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामूळे प्रेक्षकांचं भरपुर प्रेम या मालिकेला मिळतं. या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात वाढती जवळिक प्रेक्षंकाच्या पसंतीस पडत आहे. ते दोघ आपल्या प्रेमाची कबूली देणार तितक्यात अरुंधतीच्या समोर असं काही समोर येतं की ते पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते.



अरुंधतीला तिचा मुलागा अभिषेक एका दुसऱ्या मुलीसोबत दिसतो. अभिषेकने तिचा हात हातात घेतलेला असतो. तो तिला घेऊन बसला आहे. हे पाहिल्यानंतर अरुंधतीला चांगलाच धक्का बसतो. एकीकडे अनघा प्रेग्नेंट आहे तर दुसरीकडे अभिषेक दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यात आता अनघाचे डोहाळजेवण आहे, यावेळी काय राडा होणार लवकरच दिसेल..अनघा लवकरच आई होणार असून देशमुख कुटुंबाने थाटामाटात अनघाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं आहे. अनघाच्या डोहाळ जेवणाला सुद्धा संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करणार आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण असलं तरी या खास प्रसंगी अभिषेकचं एक खास गुपित संपूर्ण कुटुंबासमोर उघड होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिषेकचा बदलेलला स्वभाव 

अरुंधती आणि अनघासोबतच घरातील प्रत्येकालाच खटकतोय. अनघाच्या डोहाळ जेवणाला अभिषेकचं खरं रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे.नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आई अभिला जाब विचारते.. काल तू कुठे होतास.. त्यावर अभि खोटं बोलतो.. त्यावर आई म्हणते.. 'तू मुंबईत होतास.. एका हॉटेलात..' त्यावर अनघा विचारते.. अभि.. तू कुणसोबत होता.. त्यावर अभि म्हणतो 'एका मुलीसोबत होतो'.. त्यावर आई त्याला खडसावते.. मग अभि म्हणतो माझ्याही काही गरजा आहेत. याचवेळी अनघा चक्कर येऊन पडते. आता घरात मोठा राडा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने