अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे कोश्यारींच्या अडचणी वाढणार?

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वादग्रस्त विधान केलं होतं. महाराजांबद्दल बोलताना ते आता जुने आदर्श झालेत आजचे आदर्श शरद पवार, नितीन गडकरी आहेत असं ते म्हणाले होते. त्यामुळे राज्यभर मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या सर्व प्रकरणावर पत्र लिहालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.



दरम्यान या पत्रावरून विरोधकांनी राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेलं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख(६डिसेंबर) जुनी असताना आजच ते कसं उघड झालं? असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मी भाषणात जे काही बोललो आहे त्यातली अर्धवट वाक्य घेऊन गैरसमज पसरवण्यात आला. महापुरुषांचा अवमान करण्याची मी कल्पनाही करू शकत नाही, असं भगतसिंह कोश्यारी यांनी या पत्रात लिहालं आहे.भगतसिंह कोश्यारी यांनी लिहलेल्या पत्रावरील तारीख ६ डिसेंबर आहे. ते आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी कसं काय बाहेर आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे? काय हेतू आहे, असंही अमोल कोल्हे म्हणालेत. राज्यपाल यांनी पत्रात लिहिलं आहे की, त्यांच्या मनात कोणाचा अनादर करण्याची अशी कोणतीही भावना नाही. असं असेल तर वारंवार तसी वक्तव्य का येतात? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने