"...तर निधी देणार नाही"; नितेश राणेंची मतदारांना दमदाटी

कणकवली :भाजपा आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सध्या नवा वाद उदभवण्याची शक्यता आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मतदारांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे.कणकवली नांदगाव इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही.




राणे पुढे म्हणाले, "निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणताही मंत्री माझ्याशिवाय पुढे विकासकामं करूच शकणार नाही. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही."नितेश राणेंच्या या विधानावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. तर शिंदे गट आणि भाजपा मात्र नितेश राणेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने