मद्यपानाचं व्यसन जडलंय? ही थेरपी करेल व्यसनावर मात; जाणून घ्या सविस्तर

मुंबई: अनेकांना मद्यपान करण्याची सवय असते. हळू हळू त्यांची ही सवय त्यांच्या जीवनाचा भाग होत जाते. अतिप्रमाणात मद्यापान करणे हे शरीरासाठी अजिबात चांगले नसते. तेव्हा हे व्यसन सोडवण्यासाठी किटामाइन थेरपीचा वापर केला जातो. ही थेरपी काय आहे ते समजून घेऊया.



काय आहे किटामाइन थेरपी?

तब्बल दोन यशस्वी चाचण्यांनंतर किटाइन थेरपी (Treatment) यशस्वी आणि सुरक्षित असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. किटामाईन थेरपी ही अल्कोहोलिक लोकांची पिण्याची तीव्रता आणि इच्छा कमी करण्यासाठी सहायक थेरपी आहे. ही थेरपी प्रभावी असून यावरील अभ्यासात ८६ टक्के अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.

यूकेमध्ये परत होणार चाचण्या

एक्सेटर विद्यापीठाने आयोजित केलेल्या चाचणीचा तिसरा टप्पा, यूकेमधील सात वेगवेगळ्या ठिकाणी होईल; अल्कोहोलिक असलेल्या 280 लोकांना दोन गटांमध्ये विभागले जाईल.पहिल्या चाचणीमध्ये केटामाइनच्या समान डोससह अर्धी थेरपी दिली जाईल. उरलेल्या अर्ध्या भागाला केटामाइनचा अगदी लहान डोज दिला जाईल. ज्यामध्ये अल्कोहोलचे हानिकारक परिणाम सांगणारे सात सत्रांचे शैक्षणिक सेशन दिले जाईल.

'केटामाइन फॉर रिडक्शन ऑफ अल्कोहोल रिलेप्स' (KARE) चाचणीचे नेतृत्व करणार्‍या प्रोफेसर सेलिया मॉर्गन म्हणतात की, केटामाइन आणि थेरपी अल्कोहोलच्या व्यसनावर प्रभावी उपचार म्हणून काम करते असे अभ्यासाने सिद्ध केले तर, संपूर्ण यूकेमधील रुग्णालयांमध्ये लवकरच ते आणण्याचे उद्दिष्ट असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने