'सुशांत सिंग राजपूत सारखेच मलाही...', केआरके च्या नव्या ट्वीट्सनी सोशल मीडियावर खळबळ...

 मुंबई:  कमाल आर खान उर्फ KRK याचे वादांशी जुने नाते आहे. तो अनेकदा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत असतो. बॉलीवूड स्टारवर निशाणा साधण्यात तो जरादेखील कसर सोडत नाही. सिनेमांची समिक्षा करताना तर तो सिनेमाला झोडपतोच पण त्यात काम करणाऱ्या कलाकारांवर देखील आपली वैयक्तिक खुन्नस काढताना दिसतो.आता त्यानं एक नवं ट्वीट केलं आहे,ज्यात त्यानं म्हटलं आहे की, कुणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. एवढंच नाही तर त्यानं स्वतःला सुशांत सिंग राजपूतशी देखील कनेक्ट केलं आहे. इतकंच नाही तर लवकरच तो त्याला मारण्यासाठी सुपारी देणाऱ्याच्या नावाचा खुलासा करेल असं देखील म्हणाला आहे. 



कमाल राशिद खाननं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की-'' स्वतःला तुम्ही जे सुपरस्टार म्हणवता..तुम्ही एका सिनेमासाठी १२५ करोड देखील चार्ज करता आणि मग सिनेमाला समिक्षेतून झोडपलं जाईल यासाठी घाबरता देखील. आणि म्हणूनच तुम्हाला मला मारायचं आहे जेणेकरुन मग तुम्हाला तुमचा डब्ब्यात जाणारा सिनेमा सुपरहिट बनवता येईल. तुम्ही सगळे भिकारी आहात. तुमच्या अशा जगण्यावर मी थुंकतो''. याव्यतिरिक्त केआरके नं दुसरं ट्वीट केलं आहे. ज्यात त्यानं सुशांत सिंग राजपूतचा उल्लेख केला आहे.केआरके म्हणजेच कमाल खाननं दुसरं ट्वीटही केलं आहे-''जर मला धमकावलं जात आहे तर मग सुशांतला देखील धमकावलं असणार यांनी. जर मला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे तर मग सुशांतला देखील मारलं गेलं असेल''.

केआरकेनं आणखी दोन ट्वीट्स केले होते,ज्यात त्यानं लिहिलं होतं की,''माझ्या वकीलांनी एफआयआर करण्यासाठी आधीपासूनच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. एकदा ही सगळी प्रोसेस मार्गी लागू दे मग मी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जगासमोर मला मारण्यासाठी सुपारी देणाऱ्याचे नाव समोर आणेन. आणि ज्यानं मला जेलमध्ये मारण्याचा प्रयत्न केला त्याचे नावही मी समोर आणेन. एक अभिनेता आणि एक राजकीय नेता आणि सोबत एक पोलिस अधिकारी यांनी मिळून मला मारण्याचा कट रचला आहे''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने