माझा राग माझ्यावर असुदे.. अपूर्वाने किरण मानेचे उपटले कान..

मुंबई: बिग बॉस मराठीच्या खेळाला आता 70 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे शेवटच्या एका महिन्यात स्वतः घरात टिकवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. अगदी अटीतटीचा सामना यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे वाद , भांडण आणि राडा हे सुरूच आहे. पण आज घरात अभिनेता पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी येणार आहे. त्यांच्या उपस्थितीच कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. यावेळी किरण आणि अपूर्वामध्ये चांगलीच बाचाबाची होताना दिसणार आहे.आज सोनाली आणि पुष्कर घरातील सदस्यांवर सोपवणार आहेत "चैन पडेना आम्हांला" हे कॅप्टन्सी कार्य. आता यात कोण बाजी मारणार ? आणि कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? कि हे कार्य देखील सदस्य रद्द करणार ? हे आजच्या भागात कळेलच. पण यामध्ये राडा होणार ही निश्चित..



या कार्य दरम्यान अपूर्व आणि किरण मध्ये जरा मतभेद होणार आहेत. आजच्या भागात दिसेल की, अपूर्वा किरणला म्हणते, 'मला इतकंच कळतं तुझ्या माझ्यात कितीही वाद झाला तरी तू जेव्हा जेव्हा कॅप्टन्सीसाठी उभा राहिला आहे किंवा जेव्हा तू खेळायला जातो ना तेव्हा तेव्हा मी आणि अक्षय तुझ्यासाठी उभे राहतो. तसंच तूही माझ्यावरचा राग आहे ना तो माझ्यावर राहू दे.

त्यावर किरण म्हणतो, 'तुझ्यावर राग नाही माझा. अपूर्वा म्हणाली, जेव्हा मी खेळत असते ना मला कुठंलाही सदस्य Cheer Up करत नाही.. हे मी पहिल्या दिवसापासून पाहिलं आहे. पण जेव्हा अक्षय खेळतो तेव्हा अख्ख घर त्याच्या विरुध्द्व खेळतं... तुझ्याकडून मला हि अपेक्षा नाही, बाकी मला काही म्हणायचं नाही. चूक तुझी नाही माझी आहे कि मी अपेक्षा करते. मी काही फोर्स नाही करू शकतं. फक्त माझा राग माझ्यावर असुदे.' असं अपूर्वा किरणला सुनावते. आता खेळात नेमकं काय होतंय ते कळेलच..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने