मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण.. शरद पोंक्षे यांचे वादग्रस्त विधान

मुंबई:मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीतया पोस्ट मध्ये पोंक्षे म्हणतात, 'सातत्यानं सावरकर आठवतात.. १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले की, “मला मुसलमानांची,ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे राहतात”.. या पोस्ट सोबत त्यांनी एक वादग्रस्त विधानही केले आहे. '' ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.'' असे पोंक्षे यांनी म्हंटले आहे. आहे. त्याच विषयावर आधारित एक खळबळजनक ट्विट त्यांनी केले आहे.



शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सध्या भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात हिंदुत्वाचे वारे प्रचंड वेगाने वाहत आहेत. परिणामी काही वादही सुरू झाले आहेत. एकीकडे कट्टर हिंदुत्वाचा विरोध होत आहे तर कुठे महापुरुषांचा अपमान केला जात आहे. पण या परिस्थितीत सारे हिंदू एकत्र नाहीत, याची जाणीव शरद पोंक्षे यांना झाली आहे. म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे.या ट्विट मध्ये त्यांचा रोख नेमका कुणाकडे ही त्यांनी स्पष्ट लिहिलं नसलं तरी त्यांच्या या ट्विटची प्रचंड चर्चा आहे. आता यातून कोणता नवा वाद उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने