मागच्या निवडणुकीने जन्म दिलेल्या युवा नेत्यांचं आज काय झालं?

गुजरात :२०१७मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांचं नाव देशभर गाजलं ज्यांनी काँग्रेससाठी जिवाचं रान केलं, त्यांची यावळेच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे, ते पाहूया.काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले युवा नेते हार्दिक पटेल वीरमगाम मतदारसंघामधून उभे होते. पाटीदार नेते म्हणून हार्दिक यांची ओळख आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान ही लढत चर्चेत होती. हार्दिक पटेल यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला आहे.



जिग्नेश मेवाणी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. २०१७मध्ये मेवाणी हे अपक्ष उमेदवार होते. तेव्हा ते विजयी झालेले. मात्र यावेळी त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. वडगाम मतदारसंघातून मेवाणी यांची मणिभाई वाघेला यांच्याशी लढत झाली. शिवाय आपचे भाटिया हेही मैदानात होते. त्यामुळे ही लढत रंजक झाली. मेवाणी यांना ४५ हजार ८३४ मतं मिळाली तर मणिभाई जेठाभाई वाघेला यांना ४७ हजार ३५९ मतं मिळाली, ते विजयी झाले आहेत..गांधीनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अल्पेश ठाकोर आघाडीवर आहेत. त्यांना ७२ हजार ८५१ मतं मिळाली असून काँग्रेस उमेवदार डॉ. हिमांशू पटेल यांना ५४ हजार ८५५ मतं मिळालेली आहेत. अल्पेश ठाकोर हेही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांचा विजय निश्चत मानला जातोय.२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत या तीन नेत्यांनी भाजपला जेरीस आणलं होतं. त्यांच्यामुळे काँग्रेसला ७७ जागांवर विजय मिळाला. यावेळी मात्र काँग्रेस १६ जागांवर अडून बसलं आहे. तर भाजपने १५६च्या पुढे आघाडी घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने