'कांगडा' जिंकणारा पक्षच मिळवतो सत्ता; यावेळी मतदारांनी...

नवी दिल्ली:  हिमाचलप्रदेशात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होतं. आजपर्यंतचा हिमाचल प्रदेशचा हा इतिहास राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसला हिमाचल प्रदेशमध्ये विजयाची आस होती. त्यांची ही आस खरी होताना दिसत असून सध्या तरी काँग्रेस आघाडीवर दिसून येत आहे. मात्र हिमाचलमधील असा एक भाग आहे, जो या भागात विजयी होतो, त्या पक्षाची हिमाचलमध्ये सत्ता येते, अशी अख्यायिका आहे.१९९० पासून सातत्याने हिमाचलमध्ये सत्तांतर होत आलं आहे. हिमचलमधील कांगडा परिसर आहे. याच भागातून सत्तेचा रस्ता जातो. कांगडा परिसर कायम हिमाचलमध्ये किंगमेकर ठरला आहे. हिमचलप्रदेशमध्ये तीन प्रमुख भाग आहेत. यामध्ये कांगडा, मंडी आणि शिमला आहे. कांगडा भागात सर्वाधिक २५ मतदार संघ आहे. मंडीमध्ये २४ आणि शिमल्यात १९ मतदारसंघ आहे.



मंडी भाजपचा गड मानला जातो. तर शिमला काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र कांगडा क्षेत्रात कोणताच एक पक्ष निवडून येत नाही. कांगडामध्ये कांगडा, चंबा आणि उणा जिल्हे येतात. कांगडा जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघ आहे. त्यामुळे कांगडा जिल्हा किंगमेकर आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने कांगडामध्ये १५ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे याच कांगडा जिल्ह्यातील आहे.सध्या तरी हिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. आतापर्यंत काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने ९ जागा जिंकल्या असून २६ जागांवर भाजप आघाडीवर आहे. मात्र कांगडा जिल्ह्यातील १५ जागांवर सध्या तरी समिश्र चित्र दिसत आहे. त्यामुळे अजुनही काँग्रेस सत्तास्थापणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने