आज येणार 'तारे जमीन पर', पाहता येणार उल्कापात

मुंबई : आज आकाशात एक वेगळाच नजारा बघायला मिळणार नाही. आकाशातले तारे आपल्या दिशेने झेपावताना बघत त्यांच्या वर्षावाचा आनंद सगळ्यांना घेता येणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे. ही घटना वर्षातून ७ वेळा अनुभवता येते.बातम्यांनुसार आज आकाशातून प्रत्येक तासाला १०० पेक्षा जास्त उल्का धरतीवर पडणार आहेत. या घटनेला जेमिनिड मेटियोर शॉवर म्हणतात. कारण हा उल्कापात मिथून राशीत होणार आहे.



किती वाजता दिसणार?

तसं तर सुर्यास्तानंतर दिसायला सुरूवात होते. साधारण १० वाजेच्या सुमारास ते स्पष्ट होते. हा उल्कापात मिथून राशीत आहे. त्यामुळे जेव्हा ही रास आकाशात आपल्या डोक्यावर असते तेव्हा सर्वाधिक उल्कापात बघायला मिळतो. मिथून रास साधारण रात्री २-३ वाजेदरम्यान डोक्यावर असते. त्यावेळी सर्वाधिक उल्कापात दिसतो. पण सध्या आलेल्या आभाळाने हे दृश्य कितपत दिसेल याविषयी साशंकता आहे.

काय असतो उल्कापात ?

मृत लघूग्रह किंवा धूमकेतूंच्या कक्षेतून पृथ्वीचा प्रवास होत असताना गुत्वाकर्षणाने हे तुकडे पृथ्वीकडे आकर्षित होतात. वायूच्या घर्षणाने ते पेट घेतात. त्यामुळे दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या रॉकेट फटाक्यांप्रमाणे काहीसे हे दृश्य दिसते. त्यामुळे आकाशातून ताऱ्यांचा वर्षाव होत असल्याचं दृश्य दिसतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने