गल्लोगल्ली मिळणाऱ्या मोमोजचा इतिहास तुम्हाला माहितीये का?

मुंबई : मोमोज ही अशी लोकप्रिय डिश आहे की नाव ऐकताच तोंडाला पाणी येतं. आपण एवढ्या आवडीनं खाणाऱ्या मोमोजचा खरा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का मोमोज कुठून आले ? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.मोमोज ही डिश सर्वच वयोगटातील लोकांना आवडते. मग ते वेज असो की नॉनवेज. सर्वच मोमोजला खूप आवडीने खातात. पटरी पासून मोठमोठ्या हॉटेलपर्यंत मोमोज मिळतात. क्वचितच कुणी एखादा असेल ज्याने मोमोज खाल्ले नसावेत.






मोमोज ही भारताची डिश नाही. ती तिबेटची डिश आहे. नेपाळवरुन आल्याने या डिशने भारतातील स्ट्रीट फूडमध्ये आपली जागा तयार केली.असं म्हणतात की तिबेटच्याही आधी मोमोज चीनमध्ये बनवले जायचे. मात्र हे बनविण्याची पद्धत वेगळी होती. मोमोजचा खरा अर्थ वाफेवर बनवलेली चपाती. असं ही म्हणतात की मोमोज ही डिश सर्वात आधी तिबेटच्या लहासा येथे बनवली होती.

मोमोज हे व्हेज आणि नॉन-व्हेज अश्या दोन्ही प्रकारात असते. याशिवाय मोमोज तळून किंवा उकडून बनविले जातात. बाहेरचं आवरण हे कणिक किंवा मैद्यापासून असतं तर आतलं सारण हे कोबी, गाजर, सिमला मिरची आणि आपल्या आवडीच्या भाज्यांचं असतं. नॉन-व्हेज मोमोस मध्ये चिकन, मटण, अंडं आणि काही ठिकाणी मासे सारण म्हणून भरतात.मोमोज एक अशी डिश आहे जी भारतात सर्वच राज्यात मिळते. असं म्हणतात की जेव्हा तिबेटमधील लोक भारतात आले तेव्हा खऱ्या अर्थाने भारतात मोमोज आले आणि हळुहळू हे भारतातील लोकप्रिय डिश झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने