राष्ट्रवादीवरचे शिंतोडे शिवसेना स्वत:वर का घेतेय; आंबेडकरांचा सवाल

मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात महाविकास आघाडी सामील होणार की, नाही याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र ऐन मोर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरची शिंतोडे शिवसेना आपल्या अंगावर का घेतेय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.  



दरम्यान सीमावादात काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोषी आहेत. जेवढ्या लवकरात लवकर शिवसेना दोघांपासून वेगळी राहिल तेवढे त्यांच्यावर शिंतोडे उडणार नाही. मात्र आता अविकासीत गावांमुळे शिवसेनेवरही शिंतोडे उडतील. माझं एवढच म्हणण आहे की, सीमावादाचे शिंतोडे शिवसेना त्यांच्यावर का उडवून घेतेय, असा माझा सवाल असल्याचं आंबेडकर म्हणाले. तसेच मोर्चात सीमावादाचा मुद्दा नव्हता. मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी सीमावाद आमचा मुख्य मुद्दा असल्याचं स्पष्ट केल्याचंही आंबेडकर यांनी नमूद केलं.

दरम्यान शिवसैनिक आम्ही एकच आहोत हे दाखविण्यासाठी उत्सुक असल्याचं मी उद्धव ठाकरेंना बोललो होतो. तेव्हा हा कार्यक्रम शिवसेनेच्या बॅनरखाली करा, असं मी बोललो होतो. मात्र उद्धव यांनी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोहत सरकारमध्ये सोबत होतो, असं सांगितलं. मात्र या मोर्चात शिवसेना आपली ताकद दाखवणार हे निश्चित असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने