अफाट..अद्भूत..अचाट..'अवतार 2 ' पाहून भारावलं पब्लिक!

 मुंबई: 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची वाट जगभरातील चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. आज सिनेमा अखेर जगभरात प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमरून यांच्या अवतार सिनेमाचा हा सीक्वेल आहे. सिनेमातील मोशन पिक्चर आणि व्हीएफक्सनं प्रेक्षकांचे मन जिंकलंय असं चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.'अवतारः द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली आहे,आणि सर्वच अवतार चाहत्यांनी आता थिएटरची वाट पकडली आहे. लोक ट्वीटरवर सिनेमातील सीन्सच्या काही इंट्रेस्टिंग क्लीप शेअर करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कोणी याला व्हिज्युअल ट्रीट म्हटलं आहे तर कोणी ब्लॉकबस्टर सिनेमा.






ट्वीटरवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की- ''तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा खूपच कमाल आहे. क्वाट्रिच बदला घ्यायला परत आला आहे,मग सुली आपल्या कुटुंबाचे रक्षण करेल का?,वॉटर सीक्वेन्स तर अद्भूत आहेत सिनेमात.''एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे-''अवतार २ चा रिव्ह्यू- सिनेमातील अनेक गोष्टी एक भन्नाट अनुभव देतात. कुटुंबाच्या अवतीभोवती हा सिनेमा फिरतो.एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,''तुम्हाला माझ्याकडून 'अवतार २' चा रिव्ह्यू जाणून घ्यायचा आहे का? मी खूप थोडक्यात सुंदर रिव्ह्यू देतो. हा सिनेमा म्हणजे मॅजिकल अनुभव आहे, पहिल्या भागाच्या तुलनेत हा नवा भाग तुम्ही अधिक एन्जॉय कराल. जेम्स कॅमरुनने खूप अद्वीतीय काम केलं आहे आणि मी सल्ला देईन की सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पहा''.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,''अवतार म्हणजे मास्टरपिस. लागलीच तिकीट बूक करा''.'अवतार: द वे ऑफ वॉटर' जेम्स कॅमरून दिग्दर्शित एक कमाल सायन्स फिक्शन आहे. अवतारचा हा भाग पेंडोका आणि त्याच्या स्वदेशी लोकांच्या कहाणीला पुढे घेऊन जाते. या सिनेमात सेम वर्थिंग्टन,जो सलदाना,सिगोरनी,वीवर,स्टीफन लैंग,केट विसंलेट,क्लिफ कर्टिस आणि जोएल डेव्हिड मूर सारख्या हॉलीवूडच्या कलारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार,समोर आलं आहे की ५ लाखाहून अधिक तिकिट्स या सिनेमाच्या विकल्या गेल्या आहेत. बोललं जात आहे की, प्रभासच्या 'बाहुबली २' चा रेकॉर्ड तोडून हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला हॉलीवूड ओपनर ठरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने