स्वस्तात मस्त! अवघ्या १० हजारांच्या बजेटमध्ये आला नोकियाचा जबरदस्त स्मार्टफोन, पाहा फीचर्स

मुंबई: एचएमडी ग्लोबलने भारतात आपला बजेट स्मार्टफोन Nokia C31 ला लाँच केले आहे. या फोनची सुरुवाती किंमत ९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.६७ इंच एचडी डिस्प्ले आणि ३ दिवसांची दमदार बॅटरी लाइफ मिळते. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात अँड्राइड १२ आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. Nokia C31 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.



Nokia C31 ची किंमत

Nokia C31 ला तुम्ही चारकोल, मिंट आणि सियान रंगात खरेदी करू शकता. फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला फक्त १०,९९९ रुपये खर्च करावे लागतील. फोनला नोकिया इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.

Nokia C31 चे स्पेसिफिकेशन

Nokia C31 मध्ये ६.७४ इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. डिस्प्ले २.५ कर्व्ड ग्लास प्रोटेक्शनसह येतो. हँडसेटमध्ये ऑक्टाकोर यूनिसोक प्रोसेसरसह ४ जीबीपर्यंत रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. फोन अँड्राइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट मिळेल.

Nokia C31 चा कॅमेरा आणि बॅटरी लाइफ

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात पॉवर बॅकअपसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनला एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी ३ दिवस सहज टिकेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने