हे व्हायचच होतं! अक्षय अपूर्वामध्ये जोरदार भांडण..

मुंबई: बिग बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. 80 हून अधिक दिवस घरात एकत्र राहिलेले ही सदस्य काही दिवसातच बिग बॉसचा खेळ जिंकून आपल्या घरी जाणार आहेत. या 80 दिवसात बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनी अनेक राडे, वाद, भांडणं पाहिली. अगदी किरण- विकास सारखे मित्र एकमेकांच्या कट्टर विरोधात जातानाही पाहिले. पण बिग बॉसच्या घरात अशी एक जोडी आहे जी शेवटपर्यंत एकत्र राहील असे प्रेक्षकांना वाटत होते. आणि त्यांच्यातही आता मोठी खडाजंगी झाली आहे.

बिग बॉस च्या घरात सर्वात हुशार आणि क्रमांक 1 चा खेळाडू म्हणून अक्षयची ओळख झाली आहे. तर कुणालाही न बधणारी, तोडीस तोड उत्तर देणारी आणि आपल्या आवाजाने घर दणाणून सोडणारी अशी अपूर्वा नेमळेकर आहे. विशेष म्हणजे या दोघांची अगदी घट्ट मैत्री आहे. त्यामुळे या जोडीच्या सहसा कुणी वाटेला जात नाही. सगळेच त्यांना दबकून असतात. अख्ख घर एकमेकांशी भांडलं तरी ते दोघे उत्तम पद्धतीने न भांडता चर्चेतून प्रश्न सोडवतात. त्यांच्या मैत्रीचे दाखले स्वतः मांजरेकर देतात. अशा या जोडीमध्ये आता तब्बल 80 दिवसांनी फुट पडली आहे.



नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. यामध्ये अपूर्वा आणि अक्षय मध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. यामध्ये अक्षय अपूर्वाला म्हणतो, 'मी सतत तुझ्या मर्जीने नाही चालू शकत.. ' त्यावर अपूर्वा त्याला म्हणते, 'तुला आज झालय काय? असा का टोन लागलाय तुझा..' त्यावर अक्षय म्हणतो, 'मी तुझ्याशी चार वेळा बोलायला आलो.. तु बोलली का माझ्याशी..' मग अपूर्वा म्हणते, 'हा जर तुझा विचार असेल तर माझ्याशी नाही बोललास तरी चालेल.. मी का सतत तुझ्या मैत्रीची भीक मागू' त्यावर अक्षय म्हणतो.. 'ठीक आहे नको बोलूया..' या वादानंतर अपूर्वा म्हणजे 'ओके.. नको बोलूया'.. त्यावर अक्षयला राग अनावर होतो आणि तो म्हणतो, 'नेमळेकर तु एकनंबरची स्वार्थी आहेस..' आता हा वाद किती विकोपाला गेलाय ही आजच्या भागात कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने