अबब! 26 फूट उंच अन् 15 फूट कंबर; भारतातील सगळ्यात मोठी पँट बघितलीत का?

सांगली 'जागतिक टेलर्स डे' दरवर्षी २८ फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून मागल्या वर्षी भारतातील सगळ्यात मोठी पँट तयार करण्यात आली होती. ही पँट यावर्षी सांगलीच्या एका प्रदर्शनात ठेवण्यात आली. या पँटची उंची बघून आकाशाला गवसणी घातले की काय असा भास तुम्हाला होईल. ही पँट प्रेक्षकांचं आकर्षण ठरली आहे.

प्रदर्शनातील संयोजकांच्या मागणीवरून ही पँट तयार करण्यात आली आहे. मिरजच्या इमरान मलिदवाले स्टायलप टेलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पँट तयार केली आहे. वर्ल्ड टेलर्स डे निमित्ताने मागल्या वर्षी २८ फेब्रुवारीला ही पँट तयार करण्यात आली. इमरान यांनी त्यांचे सांगलीचे मित्र अॅरो मास्टर तसेच मिरजचे स्टायलिश टेलर यांच्यासमोर या पँटची संकल्पना मांडली होती. तिघांनी मिळून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.या भल्या मोठ्या पँटला तयार करण्यासाठी साधारण आठ दिवस दोन तासांचा कालवधी लागला. या पँटसाठी लागणारं साहित्य एका कंपनीकडून खास बनवून घेण्यात आलं होतं. या पँटला हँडमेड बटन्स लावण्यात आल्या आहेत. 

पँटची वैशिष्ट्ये

भारतातील सगळ्यात मोठ्या पँटला बनवण्यासाठी तब्बल ५० मीटर कापड लागले. या पँटची उंची तब्बल २६ फूट आहे. तसेच या पँटची कंबर १५ फूट आहे. या पँटची मांडी १० फूट तर पँटचा बॉटम ३ फूटांचा आहे.विशेष म्हणजे या पँटला लागलेले बटन्स सागवणी लाकडावर खास नक्षीकाम करून बनवण्यात आले आहेत. पँटला आतून लागणारी ग्रीपसुद्धा खास कंपनीकडून बनवून घेण्यात आली आहे. सांगली फेस्टिवल मध्ये ठेवण्यात आलेली ही पँट प्रेक्षकांचे आकर्षण ठरली. तसेच सोशल मीडियावरही याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने