सोमनाथ मंदिरात आहे असा एक रत्न ज्याच्या स्पर्शाने दगड सुद्धा सोन्यात बदलतो

मुंबई: भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ज्याची ओळख आहे ते गुजरातचे सोमनाथ मंदिर जगप्रसिध्द आहे. हे मंदिर गुजरातच्या वेरावळ बंदरापासून थोड्या अंतरावर प्रभास पाटण येथे आहे. शिव महापुराणात या ज्योतिर्लिंगासंदर्भात असे सांगितले आहे, की सोमनाथची शिव लिंग स्वतः चंद्र देव यांनी स्थापित केले आहे. म्हणून शिवलिंगाचे नाव सोमनाथ असे आहे.सोमनाथ मंदिराशी संबंधित प्राचीन कथा सांगितल्या जातात. यातल्याच एका पौराणिक कथेनुसार, सोम किंवा चंद्राने राजा दक्षाच्या सत्तावीस मुलींशी लग्न केले होते. पण त्याने फक्त एकाच पत्नीवर सर्वात जास्त प्रेम केले. आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्यांना शाप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल.




यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली. राजा दक्षाच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमने शिव पूजेला सुरुवात केली. भगवान शिवाने सोमच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केले. शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर बांधले आणि मंदिराला सोमनाथ मंदिर असे नाव देण्यात आले.प्राचीन काळातील अनेक मुस्लिम आक्रमकांनी आणि पोर्तुगीजांनी हे मंदिर वारंवार पाडलं.सोमनाथमध्ये दूसरं शिव मंदिर वल्लभीचे यादव राजांनी ईसवी सन 649 मध्ये बनवलं होतं. ते ईसवी सन 725 मध्ये सिंधचा गव्हर्नर अल-जुनैदने नष्ट केलं होतं. त्यानंतर गुर्जर प्रतिहार वंशचे राजा नागभट्ट द्वितीय द्वारा ईसवी सन 815 मध्ये तिसऱ्यांदा शिव मंदिराची रचना करण्यात आली. या मंदिरची रचना लाल बलुआ दगडांनी करण्यात आली आहे. नागभट्टद्वारे सौराष्ट्रमध्ये सोमनाथ मंदिराच्या दर्शनाचे ऐतिहासिक पुरावे आढळून येतात.

त्यानंतर चालुक्य राजा मुलराजने ईसवी सन 997 मध्ये या मंदिराचं नूतनीकरण केलं. ईसवीसन 1024 मध्ये सोमनाथ मंदिराला तुर्क शासक महमूद गजनवीने तोडलं. गझनीने मंदिरातून जवळपास 2 कोटी दिनार लूटून ज्योतिर्लिंगला तोडलं. जवळपास 50,000 हजार लोक मंदिराची रक्षा करत असताना त्यांची हत्या केली होती. महमूदच्या हल्ल्यानंतर राजा कुमारपालने ईसवीसन 1169 मध्ये उत्कृष्ट दगडातून या मंदिराची पुनर्रचना केली. पण, अलाउद्दीन खिलजीने गुजरात विजयदरम्यान ईसवी 1299 मध्ये मंदिर पुन्हा उध्वस्त केलं.

पुढे या मंदिराचं पुनर्रचना सौराष्ट्रचे राजा महीपाल यांनी ईसवी सन 1308 मध्ये केलं होतं. 1395 मध्ये या मंदिराला पुन्हा एकदा गुजरातचे गव्हर्नर जफर खानने नष्ट केलं होतं. तसेच, गुजरातचे शासक महमूद बेगडा याने अपवित्रही केलं होतं. सोमनाथ मंदिराला शेवटच्या वेळी ईसवी सन 1665 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने अशा पद्धतीने नष्ट केलं होतं की याची पुनर्रचना केलीच जाऊ नये. नंतर सोमनाथ मंदिराच्या स्थानावर 1706 मध्ये एक मशीद बनवण्यात आली.मात्र, 1783 मध्ये अहिल्याबाईंनी पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून उद्ध्वस्त झालेल्या मंदिराजवळ स्वतंत्र मंदिर बांधले. इतिहासकार म्हणतात की सोमनाथ मंदिर 17 वेळा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी पुन्हा बांधले गेले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सध्याच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि 01 डिसेंबर 1955 रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ते राष्ट्राला समर्पित केले.असे म्हणतात की प्रसिद्ध स्यमंतक रत्न सोमनाथ मंदिरात शिवलिंगाच्या पोकळीत सुरक्षितपणे लपवून ठेवण्यात आले आहे. या रत्नाला दगडाचा स्पर्श झाल्यास त्यातून सोने निर्माण होते. थोडक्यात या रत्नात दगडाला पण सोन्यात निर्माण करण्याची क्षमता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने