'जे रंगात धर्म शोधतात..त्या माणसांचे मन..', दीपिकाचं हे वक्तव्य आगीत तेल ओतणार...

मुंबई: शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाचं पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर मेकर्सनी सिनेमातलं पहिलं गाणं 'बेशरम रंग' प्रदर्शित केलं आणि देशभरात खळबळ उडाली. गाण्यात दीपिका खूपच सेक्सी आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे ते तिनं परिधान केलेल्या रिवलिंग कपड्यांमुळे..आणि याच तिच्या बिकिनीनं अख्ख्या सिनेमाला अडचणीत टाकलं आहे.



देशभरातून सिनेमावर आक्षेप घेतला जात आहे. सुरवातीलाच मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं होतं की सिनेमातील सीन्स आणि ड्रेस बदलले गेले नाहीत तर आमच्या राज्यात हा सिनेमा प्रदर्शित करू दिला जाणार नाही.यानंतर हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी दीपिकाच्या केसरी रंगाच्या बिकिनीवरनं प्रश्न उभा केला. यानंतर सोशल मीडियावर भगव्या रंगाच्या बिकिनीवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. शाहरुखचे चाहते बोलताना दिसत आहेत की याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी भगव्या रंगाचे सेक्सी कपडे घालून आयटम सॉन्ग केले आहेत मग आताच का आक्षेप घेतला जात आहे? 

यादरम्यान आता दीपिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ही व्हिडीओ क्लीप तिच्या बाजीराव-मस्तानी सिनेमातील आहे. हा व्हिडीओ म्हणजे अशा लोकांवर केलेला पलटवार आहे जे रंगाला धर्माशी जोडू पाहत आहेत.दीपिका पदूकोणच्या या व्हिडीओला शेअर करत नेटकऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'हे खरं आहे की प्रत्येक धर्मानं आपला असा एक रंग निवडला आहे,पण रंगाचा तर कोणताच धर्म नसतो,माणसाचं मन मात्र नक्कीच काळ असतं,ज्याला प्रत्येक रंगात एक धर्म दिसतो'.

बाजीराव मस्तानी सिनेमातील या व्हिडीओ क्लीपमध्ये दीपिका हाच डायलॉग बोलताना दिसत आहे. ती म्हणताना दिसते आहे की,''माता दुर्गाला सजवताना तिला हिरव्या रंगाचा चूडा घातला जातो,हिरव्या रंगाचीच शाल पांघरली जाते आणि हिरव्या रंगाचीच साडी-चोळी नेसवली जाते. दर्गामध्येही मोठ-मोठे पीर फकीरही केशरी रंगाची चादर मजारवर चढवतात,तेव्हा रंगाचा कोणीच विचार करत नाही का?''सोशल मीडियावर सध्या 'पठाण' सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. भडकलेले नेटकरी बोलताना दिसत आहेत की या गाण्यात अश्लीलपणा दाखवला गेलाय. दीपिका पदूकोणवर देखील निशाणा साधला आहे.देशभरातून 'पठाण'ला तीव्र विरोध होत असताना मात्र शाहरुख खानचे चाहते त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की,याआधी अनेक अभिनेत्रींनी आयटम सॉंगमधून भगव्या रंगाचे सेक्सी कपडे घातले आहेत मग आता पठाणलाच का बॉयकॉट केलं जातंय या कारणाने?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने