कतरिना 'लाडू की बर्फी'? बेबी बंपच्या फोटोची चर्चा

मुंबईबॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या नावाचं मोठं ग्लॅमरही आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिना वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिच्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांना, चाहत्यांना बोलण्यास भाग पाडलं आहे.आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचे फोटो पाहणे, त्या व्यक्तीशी संबंधित एखादी रंजक गोष्ट माहिती करुन घेणे चाहत्यांना आवडते. सुरुवातीला कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाच्या बातमीनं नेटकऱ्यांना कोड्यात टाकले होते. त्या लग्नाची तयारी त्याचे डेस्टिनेशन, त्या लग्नासाठी असणारा खास बंदोबस्त, व्हायरल झालेली नियमावली यामुळे चाहत्यांना विकी - कतरिनाच्या लग्नाविषयी फारच कुतूहल होते. आता कतरिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यात तिचा तो फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.



कतरिनाचा त्या अवॉर्ड फंक्शनमधील लूक व्हायरल झाला असून तो नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये कतरिनाचे पोट थोडेसे वाढलेले दिसते आहे. तो व्हिडिओ व्हायरल होताच त्यावरुन वेगवेगळे प्रश्न कतरिनाला विचारण्यास सुरुवात केली आहे. एकानं थेट, कतरिना लाडू की बर्फी अशी विचारणाल तिला केली आहे. तो व्हिडिओ म्हणजे एकप्रकारे बेबी बंपच आहे. असे चाहत्यांचे म्हणणे आहे.बॉलीवूडमध्ये सध्या मोठया प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद सुरु आहे. त्यात पठाणवरुन नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. दीपिका पदुकोननं भगव्या रंगाची बिकीनी परिधान करुन वाद ओढावून घेतला आहे. तर कतरिनाचा तो फोटो म्हणजे तिची गुड न्युज आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात ती शिमरी परिधान करुन गेली होती. तो फोटो अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने