सुशांतच्या चाहत्यांमूळं शाहरुखच्या 'पठाण'चा होतोय वाद?

मुंबई: बॉलिवूड आभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्यातच सोमवारी रिलिज झालेल्या 'पठाण' मधील 'बेशरम रंग' या नवीन आणि पहिल्या गाण्याची सर्वत्र चर्चेत आहे.या गाण्याचे व्ह्यूज काही वेळातच लाखांवर पोहोचले होते.त्या गाण्यातील दिपिकाचे कपडे त्याचा रंग आणि तिची डान्स स्टेप यावरुन जोरदार राडा सुरु आहे. त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही सुरू झाली आहे. #BoycottPathan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. लोक गाण्याबद्दल वाइट साइट कमेंट करत बेशरम रंग गाण्याला ट्रोल केलं जात आहे.



त्यानंतर यूजर्सने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते ट्विटरवर 'बॉयकॉट पठाण' ट्रेंड करत आहेत. तसेच दीपिका पदुकोणच्या गाण्यातील लूकवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सगळ्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनीही ट्विट करत पठाणवर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू केली आहे. पठाण यांच्यावर बॉलीवूडसह बहिष्कार टाकावा लागेल, असे सांगू लागले. सुशांतला न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली.सध्या ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये 'बॉयकॉट पठाण' हा ट्रेंड आहे. यूजर्स या गाण्यावर जोरदार टीका करत आहेत. एवढेच नाही तर या गाण्यातील शाहरुख आणि दीपिका यांचीही बदनामी केली जात आहे. युजर्स गाण्यात दाखवण्यात आलेले सीन आणि आउटफिट या दोन्ही गोष्टींबद्दल ट्रोल करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने