ड्रग्ज प्रकरणातील आर्यन 'व्होडका' लाँच करण्याच्या तयारीत!

मुंबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार अशी बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा आनंद झाला. काही महिन्यांपूर्वी आर्यनवर गंभीर आरोप एनसीबीनं केले होते. त्यामुळे तो बऱ्याच दिवस जेलमध्ये देखील होता.आर्यननं बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून डेब्यु करण्याचा विचार केला आहे. चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र याबरोबरच त्यानं उद्योगविश्वातही पाऊल ठेवण्याचा विचार केला आहे. तो आता व्होडकाचा प्रिमिअम ब्रँड सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हा मात्र नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.



आर्यननं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या नवीन ब्रँडविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो की, बऱ्याच दिवसांपासून माझी व्होडकाचा वेगळा ब्रँड सुरु करण्याची इच्छा होती. आता तर ते स्वप्न प्रत्यक्षात येते आहे याचा मोठा आनंद आहे. त्यासाठी जगातील दुसऱ्या मोठ्या एका कंपनीला पार्टनर म्हणून मी घेतले आहे. सोशल मीडियावर भलेही चाहत्यांनी आर्यनला शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.आर्यननं त्याचे पार्टनर लिटी बालगोआ आणि बंटी सिंग यांच्यासोबत व्होडका प्रिमिअम ब्रँड सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बऱ्याच दिवसांपासून एका वेगळ्या प्रॉडक्टच्या शोधात होतो, रिसर्चनंतर ते प्रॉडक्ट थोड्याच दिवसांत ग्राहकांसमोर येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने