पंजाब सरकार आणतय आरोग्यवर्धक दारू; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल

नवी दिल्ली: पंजाबमधील अवैध दारूविरोधातील याचिकेत पंजाब सरकारने म्हटले की, विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी पंजाब सरकार "आरोग्यवर्धक" देशी दारू आणत आहे. याबाबत पंजाब सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. पंजाब सरकार लवकरच ४० टक्के अल्कोहोलचे प्रमाण असलेली देशी-निर्मित दारू अवैध घरगुती दारूला पर्याय म्हणून बाजारात आणणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात विषारी दारूविक्री बंद करण्यासाठी हा उपाय योजला आहे.



सरकारकडून गावठी विषारी दारूपासून लोकांनी दूर राहावे, यासाठी दर्जेदार दारू देण्यात येणार आहे. स्वस्त देशी दारूचे उत्पादन आणि विक्रीचे पाऊल हा पंजाब सरकारच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणाचाच एक भाग आहे. राज्य सरकारने सध्याच्या उत्पादन शुल्क धोरणानुसार 40-डिग्री स्ट्रेंथ अल्कोहोल असलेली स्वस्त दारु आणली आहे. ही दारू अवैध दारू विक्रीला आरोग्यदायी पर्याय ठरणार आहे.फिल्ड अधिकाऱ्याना स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे ४० टक्के डिग्री स्ट्रेंथ दारुच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जेणेकरून अवैध दारू विक्री होत असलेल्या परिसरात सरकारची आरोग्यदायी दारू उपलब्ध करून देता येईल.तस्करी, अवैध दारू निर्मितीवर कारवाई व्हावी, यासाठी सर्व क्षेत्रिय घटकांना परिपत्रके देण्यात आली आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, सरकार अवैध दारू विक्रीला सरकारच्या देशी दारूच्या माध्यमातून स्वस्त पर्याय देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने