'दहावी नापास झालेल्या नेत्यांची मुलं मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहताहेत'

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांनी आरोग्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव  यांना आपला राजकीय वारस घोषित केला आहे. यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्या पात्रतेवर निशाणा साधलाय.येथील सुशिक्षित लोक रोजगारासाठी दारोदारी चकरा मारत असून, बिहारमध्ये दहावी उत्तीर्ण न झालेल्या नेत्यांची मुलं मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पाहत आहेत, असा टोला प्रशांत किशोर यांनी तेजस्वींना लगावला.प्रशांत किशोर  यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'बिहार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर पोलिस लाठीचार्ज करत आहेत. त्यांना मारहाण केली जात आहे.



 10 लाख सरकारी नोकऱ्यांचं खोटं आश्वासन देणारं सरकार टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार होताना पाहत आहे. बिहारमध्ये 10 वी उत्तीर्ण नसलेल्या राजकारण्यांची मुलं मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पाहत आहेत आणि सामान्य कुटुंबातील लोक नोकरीसाठी दारोदार चकरा मारताना दिसत आहेत.'यापूर्वीही प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले, 'बिहारच्या जनतेचा मुख्यमंत्र्यांवरील विश्वास इतका उडालाय की, नितीश कुमार सुरक्षा रक्षकाशिवाय कोणत्या गावातही जाऊ शकत नाहीत. कुडणी विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव हा नितीशकुमार यांच्यावरील जनतेचा उडालेला विश्वास आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने