सिगारेट फुकणाऱ्यांनो आता तुम्हाला.... काय आहे नवा नियम

मुंबई : जर तुम्ही धूम्रपान करत असाल आणि तुम्हाला सुट्टी सिगारेट घेण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे.संसदेच्या स्थायी समितीने तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. यासोबतच सर्व विमानतळांवर स्मोकिंग झोनमुक्त करण्याची सूचनाही समितीने केली आहे.



तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे. सुट्ट्या सिगारेटच्या विक्रीमुळे तंबाखू जनजागृतीवर परिणाम होत असल्याचे समितीचे मत आहे.दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे आपल्यासाठी धोकादायक असल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळेच भारतात दरवर्षी सुमारे 3.5 लाख लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू होतो.भारतातील सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आधीच बंदी आहे. नियम मोडल्यास 200 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. यासोबतच सरकारने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीवरही बंदी घातली आहे.

संसदीय स्थायी समितीच्या शिफारशी

१. सुट्या सिगारेटच्या विक्रीवर व उत्पादनावर बंदी
२. विमानतळांमधील धूम्रपान असणाऱ्या क्षेत्रावर बंदी घाला
३. तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी वाढवावा

WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारत सरकार तंबाखू उत्पादनांवर 75% GST लावला पाहिजे. तर, नवीन कर स्लॅबनुसार, देशात सिगारेटवर 53%, बिडीवर 22% आणि धूरविरहित तंबाखूवर 64% GST आकारला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने